१४ सप्टेंबर १९५३ साली पर्युषण पर्वाच्या तिसऱ्या आर्जव धर्माच्या पवित्र दिवशी उत्तर प्रदेश येथील मुलहेडा गांवामध्ये पिता जगदीशप्रसादजी व माता जुगमुन्दरी देवीच्या उदरी का तेजस्वी बालकाचा जन्म झाला. त्याचे नाव
Show more...१४ सप्टेंबर १९५३ साली पर्युषण पर्वाच्या तिसऱ्या आर्जव धर्माच्या पवित्र दिवशी उत्तर प्रदेश येथील मुलहेडा गांवामध्ये पिता जगदीशप्रसादजी व माता जुगमुन्दरी देवीच्या उदरी का तेजस्वी बालकाचा जन्म झाला. त्याचे नाव 'विनोद' असे ठेवण्यात आले. चार मुले व चार मुली असा त्यांचा परिवार. त्यातील हे 'तिसरे' अपत्य होते. लहानपणापासूनच विनोदला खऱ्या देव- शास्त्र-गुरू विषयी अत्यंत भक्ती होती. वयाच्या ८ व्या वर्षापासूनच दररोज सोवळे नेसून भगवंतांचा अभिषेक करणे व जिनवाणी मातेला उत्तमांगावर धारण करून जयनादामध्ये पीठावर स्थापन करणे व पंडितजी जिनवाणी वाचण्यासाठी पाने पलटून देणे इत्यादी सेवा उत्साहाने करीत. वास्तविक हे पूर्वजन्मचाच संस्कार असावेत. झाडाची फांदी घेऊन नग्न मुनी होण्याचा खेळ खेळीत असे. घरची परिस्थिती साधारण असतानाही स्वपुरूषार्थाने स्टेटिटिक्स विषयामध्ये एम.एस्सी. ची परीक्षा मेरीटमध्ये उत्तीर्ण होवून पदवी संपादन केली. बँकेमध्ये सर्व्हिस करीत अनेक परीक्षा देऊन मॅनेजर पदापर्यंतचे यश संपादन केले.सौ. कमलेशशी विवाह संपन्न झाला. मोठा भाऊ पित्यासमान असतो. या नात्याने लहान बहीण भावांना शिक्षणासाठी पूर्ण मदत केली. निधी नावाच्या एका कन्यारत्नाला ही जन्म दिला. लौकिक जीवनाबरोबर धार्मिक जीवनाला महत्त्वाचे स्थान दिले.उच्च पदावर असताना अनेक निराश्रित गोरगरीब महिलांना मदत केली. असहाय मुलांना शिक्षणासाठी बँकेतून सुविधा उपलब्ध करून दिली. होतकरू मुलगा दिसला की त्याला शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन पूर्ण सहायता केली. निवृत्ती काळापूर्वीच बँकेतून निवृत्त होऊन धार्मिक साधनेला प्राधान्य दिले. २०१० मध्ये कानपूर येथे १९०० क्विंटलची पंचधातूची प्रतिमा स्थापन करून पंचकल्याणिक पूजा मोठ्या प्रमाणात साजरी झाली. त्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा होता. २०१२ मध्ये विनोदजींनी प. पू. आचार्य विद्यासागरजींच्या चरणी आजीवन चपलाचा त्याग केला. २०१२ डिसेंबर मध्ये प.पू.१०८ श्रमणाचार्य विशुद्धसागरजी महाराजजींच्याकडून दुसरी प्रतिमा धारण केली. डिसेंबर २०१४ मध्ये प.पू. आचार्य सुंदरसागरजी महाराजांच्याकडून सातवी प्रतिमा घेतली व दिगम्बर निर्ग्रन्थ जैनेश्वरी दीक्षा प्रदान करण्यासाठी विनंती केली. २१ एप्रिल, २०१५ रोजी अक्षय्य तृत्तीयेच्या शुभ मुहूर्तावर ब्र. विनोदजी मुनि सुयशसागर झाले. प.पू. आचार्यश्रींच्या सानिध्यात ३-४ वर्षे अनेक क्षेत्रामध्ये विहार करून शास्त्रज्ञान व अनुभव संपादन केले. आचार्यश्रींचे अतिप्रिय शिष्य बनले. लब्धिसार व क्षपणासार ग्रंथाचे अध्ययन करण्यासाठी आचार्यश्रींची संमती घेऊन प.पू. सुहितसागरजी महाराजासोबत कुंभोज बाहुबलीकडे विहार केला. दोन वर्षे बाहुबलीमध्ये चातुर्मास करून जीवकांड, कर्मकांड, लब्धिसार, क्षपणासार, त्रिलोकसार इ. करणानुयोगाचे ग्रंथ त्याचप्रमाणे पंचास्तिकाय, समयसार, प्रवचनसार इ. आध्यात्मिकग्रंथ, न्याय, व्याकरण या सर्व विषयांचे ज्ञान संपादन केले. २०२१ मध्ये मी त्यांना दीक्षा देण्यासाठी विनंती केली. तेव्हा आचार्यश्री सुंदरसागरजींनी त्यांना १५ जून २०२१ श्रुतपंचमीच्या दिवशी व्ही.डी.ओ. रेकॉर्डिंग करून आचार्यपद प्रदान केले व दीक्षा देण्याची परवानगी दिली. २८ जुलै २०२१ रोजी आषाढ कृष्ण पंचमीच्या दिवशी आचार्यश्रींनी मला प्रथम आर्यिका दीक्षा दिली. माझे मनुष्य जन्म सार्थक झाल्यासारखे वाटले. मुनी अवस्थेत व आचार्य झाल्यानंतर एकूण ३५-४० जणांना प्रतिमा व पाच जणांना दीक्षा दिल्या. सोलापूर येथे वेदी प्रतिष्ठा. नळदुर्ग व वैराग येथे भव्य पंचकल्याणक प्रतिष्ठा आचार्यश्रींच्या मार्गदर्शनाने संपन्न झाल्या. आचार्यश्रींचे वय ७१ पण त्यांचा उत्साह १७ वर्षाच्या तरूणाप्रमाणे आहे. शास्त्र स्वाध्याय, शास्त्राचे लेखनकार्य, प्रुफ तपासणे, शिबीर घेणे, व्रतविधान करविणे, लोकांना व्रत घेण्यासाठी प्रेरणा देणे, पंचकल्याणक प्रतिष्ठा, सल्लेखना, वैय्यावृत्त इ. सर्व कार्यामध्ये त्यांचा अदम्य उत्साह व कुशलता आहे. कधी वज्राप्रमाणे कठोर तर कधी लोण्यापेक्षाही मऊ असे त्यांचे अद्भुत व्यक्तिमत्व आहे. कार्याचा निश्चय करणे व हाती घेतलेले काम तडीस नेणे हा त्यांचा स्वभाव आहे. वक्तशीरपणा, साधर्मीवात्सल्य, सरळता हे त्यांचे गुण आहेत. नावाप्रमाणेच त्यांचे सुयश सर्वत्र पसरत आहे. खरच ! गुरूंनी त्यांचे नाव विचार करून ठेवले असावे. गुरू की महिमा वर्णी न जाय, गुरू नाम जाणे मनवचनकाय ।
Show less... पूर्वाश्रमीचे नाव - ब्रः (डॉ.) सुजाताताई रोटे
जन्म व गाव - ०७ फेब्रुवारी १९६६, कोल्हापूर.
शिक्षण - लौकिक
पूर्वाश्रमीचे नाव - ब्रः (डॉ.) सुजाताताई रोटे
जन्म व गाव - ०७ फेब्रुवारी १९६६, कोल्हापूर.
शिक्षण - लौकिक -
• वरिष्ठोपाध्याय - अजमेर बोर्ड, राजस्थान सुवर्णपदक
• शास्त्री (बी.ए.) - राजस्थान विश्वविद्यालय, जयपूर
• जैनदर्शनाचार्य (एम.ए.) - राजस्थान विश्वविद्यालय, जयपूर-सुवर्णपदक
• पीएच डी. - लालबहादूर शास्त्री संस्कृत विश्वविद्यालय, नवी दिल्ली
• विषय - जयसेनाचार्यस्य तात्पर्यवृत्तिग्रन्थानां समीक्षात्मकमध्ययनम् |
धार्मिक - गुरुदेव १०८ श्री समंतभद्र महाराज व गुरुकुलमाता गजाबेन यांच्या
सान्निध्यात वयवर्षे १७ ते ५२
अखेर.
ब्रह्मचर्यव्रत -
प. पू. गुरुदेव १०८ श्री समंतभद्र महाराज यांचेकडून (सन
१९८२)
आर्यिकादीक्षा -
• आचार्य १०८ श्री सुंदरसागरजी महाराज यांचे सुशिष्य
• आचार्य १०८ श्री सुयशसागरजी महाराजयांचेकडून (दि. २८ जुलै २०२१)
संपादक - सन्मति मासिक (२००७ ते २०२१)
ग्रंथसंपदा - मौलिक कार्य-
१) प्रवचनसार: जीवनस्वातंत्र्याची कला (भाग १)
२) प्रवचनसार : जीवनस्वातंत्र्याची कला (भाग २)
३) प्रवचनसार : जीवनस्वातंत्र्याची कला (भाग ३)
४) गुरुकुलमाता गजाबेन जीवनदर्शन (मराठी व हिंदी)
५) अनेक संगोष्ठीकरिता शोधनिबंधात्मक लेखनकार्य
संपादित व अनुवादित -
१) लब्धिसार (प्रथम भाग) (मराठी व हिंदी)
२) क्षपणासार (द्वितीय भाग) (मराठी व हिंदी)
३) धवला (पुस्तक १०) (मराठी)
४) धवला (पुस्तक ११) (मराठी)
विशेष उल्लेखनीय कार्य-
⭐ करणानुयोगाच्या ३६ हून अधिक शिबिरांचे आयोजन करवून जीवकाण्ड,
कर्मकाण्ड, लब्धिसार, क्षपणासार, धवला (पुस्तक १ ते १४), कषायपाहुड (मा.१ ते ३) इ. अनेक ग्रंथ शिकविले.
⭐ आज अखेर अनेक मुनी, व्रती, प्रतिमाधारी, श्रावक-श्राविका यांना ज्ञानदानासोबत तत्त्वरूची निर्माण करून
स्थितिकरण
केले.
⭐ सन १९९० पासून निरंतर दरवर्षी अनेक शिबिरांचे आयोजन व मार्गदर्शन.
⭐ बाहुबली गुरुकुलासाठी अनेक
दातारांना प्रेरणा,
⭐ अनेक पुरस्काराने सन्मानित.
⭐ ज्ञानदान, औषधदान, अभयदान व आहारदानामध्ये सदैव तत्पर राहत असत.
⭐अनेक निराधार स्त्रिया, मुली व धार्मिक श्रावकांना आधार व सन्मार्गदर्शन. आध्यात्म, न्याय, कर्म-गणित व
चारित्राचा
सुंदर मिलाप